चोपडा राष्ट्रवादीतर्फे गॕस व पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन…..झेंडुबाम वाटप करुन करण्यात आला केंद्र सरकारचा निषेध...!

 

चोपडा राष्ट्रवादीतर्फे गॕस व पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन…..झेंडुबाम वाटप करुन करण्यात आला केंद्र सरकारचा निषेध...!

पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात झेंडुबाम वाटप करुन निषेध आंदोलन करतांना तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व इतर…! 

जळगाव/चोपडा (राज्य रिपोर्टर) : एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीमुळे देशातील सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.तरी सुद्धा केंद्र सरकारच्या नितीमुवळे गॕस,पेट्रोल,डिझेल व खाद्यतेलाच्या दरवाढ सुरुच आहे.याचा निषेध म्हणुन चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरत असलेल्या या दरवाढीविरोधात झेंडुबाम वाटप करुन अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले.

आज रोजी शहरातील जगदिश गॕस एजंसी येथे गॕस दरवाढ व ओम शांती पेट्रोलियम येथे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या नितींविरोधात सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.एकीकडे पाऊस पडत नसल्यामुळे सर्व शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना या गॕस,पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे डोकेदुखी वाढली आहे.म्हणुन केंद्र सरकारचा निषेध म्हणुन याठिकाणी झेंडुबाम वाटप करण्यात आले.मात्र येत्या 15 दिवसात याविषयी केंद्र सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

सदर आंदोलन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष  मनोज पाटील,युवक शहराध्यक्ष समाधान माळी,प्रसिद्धीप्रमुख संदिप कोळी,राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष डॉ.विजयसिंग पाटील,युवक सेवादल अध्यक्ष सतिष पाटील,विभागप्रमुख विशाल कोळी,गणेश कोळी आदिंसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments