बल्लारपूर तालुका प्रिंटर्स असोसिएशन ची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी संतोष भा. बेताल यांची निवड

 

बल्लारपूर तालुका प्रिंटर्स असोसिएशन ची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी संतोष भा. बेताल यांची निवड

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुका प्रिंटर्स असोसिएशन च्या वतीने निरोप, सत्कार व स्नेहमिलन कार्यक्रम रोज शनिवार दिनांक 24 जुलै 2021 ला सायंकाळी 6.00 वाजता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह ( रेस्ट हाउस ), बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. प्राध्यापक संजय नीडे सर (बल्लारपूर तालुका असोसिएशन सल्लागार), मार्गदर्शक माननीय श्री. नरेंद्र जी जोगी (अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मुद्रक संघ चंद्रपूर) सत्कार मूर्ती माननीय श्री. सुखरामदास जी उधवानी (कीर्ती कार्ड, बल्लारपूर) माननीय श्री. दीपक जी मांढरे (माजी अध्यक्ष बल्लारपूर प्रिंटर असोसिएशन 2020), प्रमुख पाहुणे माननीय श्री. वसंत जी खेडेकर ( वरिष्ठ पत्रकार ) आणि माननीय श्री. मंगल जीवने (  वरिष्ठ पत्रकार ), सल्लागार मा. श्री. अनिल देठे   आणि  चंद्रपूर जिल्हा मुद्रक संघ चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 यावेळी बल्लारपूर तालुका प्रिंटर्स असोशियन चे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री.संतोष भाऊराव बेताल, उपाध्यक्ष रवी मानेकर, सचिव चंद्रहर्ष भगत, सहसचिव दिनेश राखुंडे, कोषाध्यक्ष प्रशांत रामटेके, प्रचारक प्रमुख गिरीश गंधेवार, सल्लागार मा. श्री. भूपेश देवतळे, मा. श्री. अरुण अवगान व सदस्य  नंदेश पुणेकर, दिनेश माडगुल, शेख अबूबकर, विजय अवगान, महेश रणदिवे, मनोज ठाकूर, सचिन नागोसे, संजय गड्डमवार, विनोद बेताल, रामचंद्र, आनंद दुबे, नंदू जीवतोडे, सुहास वाघमारे, बबलू रंगारी आणि समस्त बल्लारपूर तालुका प्रिंटर असोसिएशनचे पदाधिकारी व  सदस्यगण उपस्तित होते.






Post a Comment

0 Comments