यंग चांदा ब्रिगेड महिलांच्या हक्काचे व्यासपीठ - आ. किशोर जोरगेवार

 

यंग चांदा ब्रिगेड महिलांच्या हक्काचे व्यासपीठ - आ. किशोर जोरगेवार

२ ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच्यासह दाताळा येथील शेकडो महिलांचा यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश


          चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :     विविध सामाजिक उपक्रम व लोकहितार्थ आंदोलने करत यंग चांदा ब्रिगेड या संस्थेने सामाजिक क्षेत्रात मोठे नाव केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या सामाजिक उपक्रमात महिलांची भुमीका ही नेहमी मोठी राहली आहे. महिलांनी महिलांना न्याय मिळवून द्यावा या करीता या संस्थेत महिला आघाडीची स्थापणा करण्यात आली असून ही संस्था महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

             आज शुक्रवार दाताळा येथील शेकडो महिलांनी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रूपर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा लोनगाडगे यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी चंद्रलोक लाँन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दाताळा ग्रामपंचायत सदस्य मंदा काळे, वर्षा मुंगुले, यांच्यासह माजी सरपंच गीता येडे यांनी यंग चांदा ब्रिगेड मध्ये प्रवेश घेतला.  या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या ग्रामीण  महिलाध्यक्ष सायली येरणे, प्रतिभा लोनगाडगे, राकेश पिंपळकर, गीता चिताडे, कीर्ती केशट्टीवार, कल्याणी देवाळकर, प्रणिता देवाळकर, मंजुषा हनुमंते आदींची मंचावर उपस्थिती होती.

                यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून शेवटच्या गरजू पर्यंत पोहचून त्याला मदत करण्याचे काम केल्या जात आहे. या कामात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांची मोठी भुमीका आहे. कोरोना काळात गरजुंच्या मदतीसाठी यंग चांदा ब्रिगेडतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे. सामाजिक क्षेत्रात आवड असणारा मोठा वर्ग यंग चांदा ब्रिगेडची जूळत चालला असून याचा मोठा फायदा मदकार्यासह सामाजिक उपक्रमासाठी होणार आहे. महिलांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठीही यंग चांदा ब्रिगेड प्रयत्न करत आहे. महिलांमधील कलागुणांना वाव मिळावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही येत्या काळात केल्या जाणार आहे. त्याच बरोबर महिला अत्याचार, घरेलू हिंसा, हुंडाबळी हे सर्व प्रकार थांबावे तसेच या प्रकारामूळे पिढीत असेलल्या महिलांना न्याय मिळावा यासाठीही संस्था कार्य करत आहे. यातून अनेक पिढीत महिलांना या संस्थेच्या महिला आघाडीच्या वतीने न्यायही मिळवून देण्यात आला आहे. यापूढेही  महिलांच्या हक्कासाठी लढा सुरुच राहणार असून यात नवनियुक्त महिला सदस्यांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवत या भागातील पिढीत महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे तसेच सामाजिक उपक्रमातून समाजात जनजागृती करावी असे आवाहण यावेळी बोलतांना त्यांनी केले. येत्या काळात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध भागात आरोग्य शिबिर आयोजित केली जाणार असून दाताळा येथील यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेनेही यात सहभाग घेत या भागातील महिलांसाठी आरोग्य शिबीर राबवावे असेही ते यावेळी म्हणाले, या प्रसंगी नवनियुक्त महिला सदस्यांच्या गळ्यात यंग चांदा ब्रिगेडचा दुपट्टा टाकुन त्यांना यंग चांदा ब्रिगेडचे सदस्यपद बहाल करण्यात आले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, शमा काजी, आशा देशमुख, प्रेमिला बावणे, अनिता झाडे, अल्का मेश्राम, अस्मिता डोनारकर आदींची उपस्थिती होती.







Post a Comment

0 Comments