वेकोलिच्या संतापलेल्या कामगारांचे कामबंद आंदोलन आंदोलनाला पाचही श्रमिक संगटनेचा पाठिंबा वेकोलिला कोटयवधीचा फटका

वेकोलिच्या संतापलेल्या कामगारांचे कामबंद आंदोलन

आंदोलनाला पाचही श्रमिक संगटनेचा पाठिंबा

वेकोलिला कोटयवधीचा फटका

माजरी(राज्य रिपोर्टर) :  माजरी-वेकोलि माजरी परिसर गेल्या पाच दिवसांपासून अंधारात बुडला आहे.तसेच विज व पाणी पुरवठा बंद असल्याने कामगारात आक्रोशही निर्माण झाला आहे.त्यामुळे वेकोलि माजरी क्षेत्राच्या पाचही कामगार संगटनेच्या नेतृत्वात कामगारांनी कामबंद आंदोलन करून उद्भवलेल्या समस्यांकडे वेकोलि प्रसासनाचे लक्ष वेधले.

कामगारांनी वेकोलि माजरी क्षेत्राच्या ओसीएम खुली खाण, नागलोन यूजी टू ओसी फेज २ या खाणीत व इतर सर्व माजरी क्षेत्रातील खाणीत कामबंद आंदोलन करून पूर्णपणे काम बंद पाडले. या वीजपुरवठा बंद असल्याने आणि आंदोलन मुळे वेकोलिला कोट्यवधींचे  नुकसान झाले आहे.

सदर आंदोलन वेकोलिच्या पाचही कामगार संगटनेच्या वतीने करण्यात येत असून वेकोलि प्रशासनाने ६६ केव्ही रोहित्राचे ३३ केव्ही मध्ये रूपांतरण करण्यापूर्वी जेसीसी सभासद व पाचही कामगार संगटनेला विश्वासात न घेता तसेच याबाबत चर्चा न करता व कोणतीही पूर्व सूचना न देता वेकोलि प्रशासन आपले मनमानी कारभार करत आहे. विद्युत व पाणी पुरवठा खंडित झाल्याने याचा थेट प्रभाव वेकोलि कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर पडला आहे.

विद्युत व पाणी पुरवठा खंडित झाल्याने  कामगारांचे लहान मूलं व त्यांचे कुटुंब होरपडत असताना मात्र वेकोलिने भाङयाचे जनरेटर लावून सर्वप्रथम अधिकाऱ्यांच्या वसाहतीत पाण्याचे पुरवठा केले. त्यामुळे वेकोलि कामगार संतप्त झाले.कामगार त्रस्त अधिकारी मस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्युत  पुरवठा खंडित झाल्याने पाच दिवसांपासून वेकोलिचे कोळसा वाहतूक ठप्प झाल्याने वेकोलिला दररोज लाखो रुपयांचे डॉमरेजच्या रूपाने दंड भरण्याची वेळ आली आहे तसेच उत्पादन बंद असल्याने कोट्यवधी चे नुकसान होत आहे.रोहित्र बदलण्याच्या प्रक्रियेत वेकोलि प्रशासनाचे आजपर्यंतचे सर्वात मोठे दुर्लक्ष समोर आले आहे.यामुळे वेकोलिचे अधिकाऱ्यांचे निष्क्रियता समोर आले आहे.

आम्ही आंदोलन करून कोळसा खाणी बंद पाडले मात्र माजरी क्षेत्राचे मुख्यमहाप्रबन्धक हे चर्चा करण्याकरिता अजूनही आमच्याकड़े आलेले नाहीत.वेकोलि वसाहतीमध्ये जोपर्यंत विद्युत व पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच राहिल अशी माहिती कामगार संगटनेचे  बीएमएसचे सचिव विवेक फाळके यांनी यावेळी माहिती दिली.

या काम बंद आंदोलन मध्ये  बीएमएसचे विवेक फाळके, आयटकचे दीपक ढोके, इंटकचे गोपाल राय,एचएमएसचे राजेंदर कायस्थ, सुरेश दातारकर, होमेन्द्र तुरकर,बीएमएसचे जगलाल चहुबा, एचएमएसचे सतीश वरखडे यांच्यासह पाचही कामगार संगटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

वर्जन--वेकोलिच्या दुसऱ्या क्षेत्रातुन रोहित्र आणण्यात आले.कार्य युद्धस्तरावर सुरु आहे.आज सांयकाळ पर्यंत विज पुरवठा करण्यात येईल. सद्या वेकोलि माजरीच्या कर्मचारी व अधिकारी वसाहतीत जनरेटर लावून टैंकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

-- व्ही. के. गुप्ता मुख्यमहाप्रबन्धक, वेकोलि माजरी क्षेत्र

Post a Comment

0 Comments