क्षत्रिय मराठा परिवारातर्फे पत्रकारांचा 'कोरोना योद्धा' म्हणून गौरव...!
जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : कोरोना विषाणू महामारीच्या संकट काळात कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जिवाची पर्वा न करता वस्तुस्थितीचे वार्तांकन करून प्रशासन व समाजाला अद्यावत माहिती पुरवणाऱ्या पत्रकारांचे कार्य आदर्शवत आहे.पत्रकारांचे हे कार्य समाजोपयोगी आहे. यांच्या कार्याची दखल घेत कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्याच्या हेतूने येथील क्षत्रिय मराठा परिवाराच्यावतीने तालुक्यातील माध्यम प्रतिनिधींचा 'कोरोना योद्धा सन्मानपत्र' देऊन गौरव करण्यात आला.
शहरातील शासकीय विश्रामगृहात दि. १७ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध दैनिके व ऑनलाइन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा शाल, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन क्षत्रिय मराठा परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, 'कोरोना योद्धा' म्हणून पत्रकारांचा सन्मान करणारी क्षत्रिय मराठा परिवार ही पहिली सामाजिक संस्था आहे. कोरोना काळात तालुक्यासह जिल्ह्याभरात व राज्यात अनेक पत्रकार बांधवांनी जोखीम पत्करत रुग्णालये, कोविड सेंटर अशा ठिकाणी भेटी देत वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडली.अनेकांना कोरोना विषाणुची बाधा झाली तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले. शासनाने पत्रकारांना देखील फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा देत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील, संजय सोनवणे, डी. बी. पाटील, संजय बारी, शामकांत जाधव, लतिष जैन, विलास पाटील, आर. डी. पाटील, मिलिंद सोनवणे, सचिन जयस्वाल, संदीप ओली, विश्वास वाडे, छोटू वारडे हे माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. विक्की सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, तालुका संपर्कप्रमुख कमलेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील, शहराध्यक्ष अमोल पाटील, तालुका समन्वयक परेश पाटील, शहर कार्याध्यक्ष छत्रपती जाधव, निलेश पाटील, अक्षय पाटील आदिंची उपस्थिती होती.
0 Comments