काल झालेल्या एका पावसात दिवसभरात 92 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नागरिकांपुढे आर्थिक संकटही आहे.
नागपूर : राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून नागपूरमध्ये पहिल्याच पावसात शहरांमध्ये पाणी शिरलं आहे. नागपूरमधील अनेक शहरांमध्ये पाणी शिरलं असून याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. यामुळे नागपूरची मुंबई होतेय का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
काल झालेल्या एका पावसात दिवसभरात 92 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नागरिकांपुढे आर्थिक संकटही आहे.
खरंतर, नागपूरमध्ये पावसाळा येण्याआधी पालिकेकडून कोणतंही काम न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याची टीका करण्यात यात आहे. तर काही नेत्यांनी याचं खापर तुकारम मुंडे यांच्यावर फोडलं आहे. मुंडेंनी शहरात कामं करून घेतली नाही अशा टीकेन आता जोर धरला आहे. दरम्यान, या सगळ्यात नागरिकांचे मात्र हाल सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवार दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी वीज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
0 Comments