झुरखेडा ग्रामपंचयात मध्ये १४ वा वित्त आयोगाच्या खात्यातून झालेला अपहार व दप्तर गहाळ प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल न केल्यास प्रशानाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांचा आत्मदहन करण्याचा इशारा...!

 

झुरखेडा ग्रामपंचयात मध्ये १४ वा वित्त आयोगाच्या खात्यातून झालेला अपहार व दप्तर गहाळ प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल न केल्यास प्रशानाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांचा आत्मदहन करण्याचा इशारा...! 

जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायत मध्ये १४ वा वित्त आयोगाच्या खात्यातून कोणतेही लिखित काम नसतांना  सरपंच, ग्रामसेवक यांच्या परस्पर सह्या करून दोन लाख शहात्तर हजार वेगवेगळ्या दोन चेक ने काढण्यात आली होती त्यानंतर ग्रामविकास खात्यातील अवर सचिव विजय चांदेकर यांनी चौकशीचे आदेश दिले त्यानंतर पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली असता ती रक्कम काढण्यात आली असे बँक स्टेटमेंट व ही बाब स्वतः ग्रामसेवक यांनी पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी यांच्या समोर लिखित स्वरूपात मान्य केली आहे तसेच चौकशी दरम्यान ती रक्कम खात्यात भरण्यात देखील आली पण पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी जे जे व्यक्ती ह्या प्रकरणात दोषी आढले आहेत यांच्यावर कोणतीही कार्यवाही अथवा गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे या प्रकरणात ते देखील तेवढेच गुन्हेगार आहेत असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील  यांचे म्हणणे आहे तसेच अजून दुसरे असे की, गावातील ग्रामपंचायत मधील दप्तर देखील गहाळ झाले आहे असे मागविल्या माहिती अधिकारातून समोर आले आहे तरी त्या ग्रामसेवकावर, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

               तसेच झुरखेडा गावात महिला सरपंच आहेत पण सर्व कामे महिला सरपंच यांचे पती हेच पाहत असतात असे सुरेश पाटील यांचे म्हणणे आहे की, असा कोणता कायदा आहे की, महिला सरपंच यांच्या पती ने गावातील कामे व सर्व पैश्यांची देवाण घेवाण पाहता येईल मग ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच का पाहिजे जर का असंच होत असेल तर अशी कामे त्यांचे पती जर का पाहात असतील तर कायदे कशासाठी आहेत. 

            सुरेश पाटील यांनी सध्याच्या काळात गावातील होणारी कामे व ग्रामसेवक लसीकरनासाठी गैरहजर राहणे तसेच गावातील कामे निकृष्ट दर्जाचे होणे अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे  करून देखील त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही आणि ते  ह्या गोष्टी पाहण्यासाठी देखील विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी हे गावात देखील आले नाहीत तसेच त्यांनी आधी गावात जाऊन कधीही पाहणी देखील केलेली नाही की, गावात ग्रामपंचायत मार्फत काय काम व कोणते चालू आहे असे   कधीही चेक केले नाही गावात सर्व कामांमध्ये  भ्रष्टाचार चालू आहे तरी देखील गावाकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. 

              त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी येत्या दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत जे कोणी ह्या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास ते दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रशासकिय कार्यालयासमोर आत्मदहन करणार  त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, यात मला काहीही बरं वाईट झाल्यास सर्व स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी हे सर्व जवाबदार राहतील असे त्यांनी आपल्याला लिखित स्वरूपात ग्रामविकास विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी जळगाव यांना कळविले आहे तरी आता ह्या प्रकरणात पुढे काय होत हे पाहणे गरजेचे आहे.





Post a Comment

0 Comments