बल्लारपूर तालुक्यात मुसळधार पाऊस : नाल्याना पूर : वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ

बल्लारपूर तालुक्यात मुसळधार पाऊस : नाल्याना पूर : वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : जवळपास मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर शहर व आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरु आहे यामुळे शेतकरी बांधव जरी सुखावला असला तरी एकसारखा कोसळणारा पाऊस मोठे नुकसान तर करेल नाही ना अशी चिंताही सतावत आहे विशेष बाब म्हणजे आज गुरुवारला चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला महत्वाचे म्हणजे महापौर यांच्या प्रभागातच नाल्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत होते शिवाय चंद्रपूर शहरातील अनेक मार्ग जलमय झाले होते बल्लारपूर  शहराचा विचार केला तर काल रात्री पासुन बल्लारपूर शहरात पाऊस कोसळत आहे यामुळे बल्लारपूर तालुक्यातील बामणी-केमतुकम ला जाणारा मार्ग बंद झाला असून भागीरथी नाल्यावरून पाणी ओव्हरफ्लो झाले आहे मात्र गोंडपीपरी आणि राजुरा मार्ग सुरू आहे मात्र वृत्त येईस्तोवर राजुरा-गडचांदूर मार्गावरील खामोना नाल्यावर 5 फुटापेक्षा अधिक पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद असल्याचे वृत्त होते याशिवाय ग्रामीण भागातील अनेक नाल्याना पूर आल्याचे वृत्त होते तसेच बल्लारपूर शहरातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याचे वृत्त असून आणखी 2 दिवस पावसाने मुक्काम ठोकल्यास बल्लारपूर शहरात पूर परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.




Post a Comment

0 Comments