पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर( राज्य रिपोर्टर ) : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 19 जुलै 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता एसीसी चांदा सिमेंट फॅक्टरी, सिमेंट नगर नकोडा येथे आगमन व कामगारांच्या समस्येबाबत अधिका-यांशी चर्चा, दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.45 वाजता केपीसीएल अंतर्गत असलेली बरांज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व कामगारांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, दुपारी 1.30 वाजता अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापन व कंत्राटदारांची जिल्हाधिकारी कायालयात बैठक, दुपारी 2 वाजता कोव्हीड संभाव्य तिसरी लाट व लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा, दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वाजता दुर्गापूर येथील लष्करे कुटुंबाची सांत्वनपर भेट, दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा, रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, उर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक बाधंकाम विभागाचा  हिराई रेस्टहाऊस, दुर्गापूर येथे आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता चंद्रपुरवरुन नवेगाव लोन, ता. सिंदेवाहीकडे प्रयाण. दुपारी 3.30 नवेगाव लोन येथे आगमन व श्री.तलांडे कुटुंबाची सात्वनंपर भेट. सांयकाळी 4.15 वाजता सिंदेवाही येथे आगमन व आदिवासी विकास विभागाच्यावतीने पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे आयोजित खावटी वाटप कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 4.45 वाजता सिंदेवाही येथून नागभिडकडे प्रयाण, सांयकाळी 5.10 वाजता नागभिड येथे आगमन व आदिवासी विकास विभागाच्यावतीने पंचायत समिती सभागृह नागभिड येथे आयोजित खावटी वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता नागभिडवरून नागपूरकडे प्रयाण.



Post a Comment

0 Comments