महाराष्ट्राचे विकासपुरुष आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरात विविध कार्यक्रमाचं आयोजन

 


महाराष्ट्राचे विकासपुरुष आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूरात विविध कार्यक्रमाचं आयोजन

बल्लारपूर  ( राज्य रिपोर्टर ) : अवघ्या महाराष्ट्रात विकासपुरुष म्हणून प्रचलित असलेले व जनसामान्य नागरिकांत भाऊ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्याचे माजी वित्त, वन व नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा उद्या 30 जुलै ला वाढदिवस या निमित्ताने भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.

       या अंतर्गत मा.सुधीरभाऊच्या दीर्घायुष्य करिता सकाळी ८:०० वा. शहरातील विविध मंदिरात व सकाळी ९:०० वा. बालाजी मंदिरात पूजा अर्चना करण्यात येणार आहे तर सकाळी १०:०० वा रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे करण्यात येणार आहे मार्कन्डेय मंदिर गौरक्षण वॉर्ड बल्लारपूर येथे सकाळी १०:३० वा रुद्राभिषेक व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सकाळी ११:०० वा. हिरकणी ग्रुप ला अन्नदाना करिता बचत भवन परिसरात आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तर सकाळी ११:३० वा. वाजपेयी कॉम्प्युटर अकादमी तर्फे ६० विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाची सुरुवात होणार आहे, सायंकाळी ४:०० वा पॉवरहाऊस परिसरात खेळाडूना साहित्य वितरण करण्यात येणार आहे तर सायंकाळी ६:०० वा. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बल्लारपूर शहरातील डॉक्टरांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. सदर सर्व कार्यक्रमात मा.चंदनसिह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष बल्लारपूर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काशीनाथ सिह, मनीष पांडे, गुलशन शर्मा, राजू दासरवार, रणविजय सिह, ई नी केले आहे.










Post a Comment

0 Comments