बल्लारपूरातील खाजगी शाळेचे व्यवस्थापन अखेर नमले : वगळलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी वर्गात समावेश

 

बल्लारपूरातील खाजगी शाळेचे व्यवस्थापन अखेर नमले : वगळलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी वर्गात समावेश 

🔹200 विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन शिकवणी वर्गात जोडले व आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला

🔹मोंटफोर्ट स्कुल पालक समिती, बल्लारपूर 

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर)  : कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अडचणी चे झाले असतांना अशातच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे तसेच अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत बल्लारपूर येथील बामणी परिसरात असलेले मोंटफोर्ट हायर सेकेंडरी स्कुल ने 2020-21 या सत्राची फी न भरल्यामुळे 6 दिवसांपूर्वी ऑनलाईन शिकवणी वर्गाच्या ग्रुप मधून जवळपास 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वगळले होते यापूर्वीच राज्य शासनाने फी न भरल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहता कामा नये असे निर्देश असतांना सुध्दा बल्लारपूर शहरात शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत करण्यात आले होते या अनुषणगाने मोंटफोर्ट स्कुल पालक समितीने या विषयाला अनुसरून पालक समितीने सदर माहिती शिक्षण विभाग व जिल्हाधिकारीना अवगत केले होते तसेच राज्य रिपोर्टर  यासंदर्भात वृत्तही प्रकाशित केले होते. 

           अखेर शाळेच्या व्यवस्थापनाला आपली चूक कळली व ऑनलाईन शिकवणी वर्गातून वगळलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा जोडले विशेष बाब म्हणजे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्याचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे त्यामुळे शाळेतील अनेक खर्च कमी झाले आहे अशा स्थितीत खाजगी शाळांनी शैक्षणिक शुल्कात सूट देने आवश्यक असतांना खाजगी शाळा मात्र फी साठी सारखा तगादा लावून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा डाव आहे याविषयावरून पालक समिती आक्रमक झाली असतांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालक समिती, मोंटफोर्ट शाळेचे व्यवस्थापन, स्थानिक प्रशासन व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत बल्लारपूर तहसील कार्यालयात बैठक पार पडली यावेळी मात्र पालक समितीने शालेय व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले व सदर  घटनेची जाणीव शालेय व्यवस्थापनाला पूर्वीच असावी म्हणून शाळेंनी आपली चूक दुरुस्त करून वगळलेल्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन शिकवणी वर्गात जोडले व आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र शाळेंनी घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध पालकांची नाराजी होती व या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला संजय आईचंवार, तहसीलदार, किरणकुमार धनावडे, संवर्ग विकास अधिकारी, वर्षा फुलझेले, शिक्षणाधिकारी, अजय दुबे, भारतीय कामगार आघाडी, सुभाष ताजने, सरपंच कळमना, ऍड हरीश गेडाम, शाळा व्यवस्थापणाकडून प्राचार्य अंथोनी ऑगस्टीन, हर्षल गाजर्लावार, विजय दिकोंडावार ऍड पवन मेश्राम, रितेश बोरकर इ ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments