सत्संग भारतीय संस्कृतीचा आधार - हंसराज अहीर

 

सत्संग भारतीय संस्कृतीचा आधार - हंसराज अहीर

गुरू पौर्णिमा निमित्य ब्राह्मवृंदाने केले रक्तदान

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सत्संग आपल्या देशाचा आत्मा आहे.यातून आपल्याला आपली संस्कृती कळते.सत्संगामूळे भारतीयत्व जपले जात आहे.अलौकिक आनंद यामुळे प्राप्त होतो.सत्संग भारतीय संस्कृतीचा आधार आहे,असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.ते महानगरातील ब्राह्मवृंदा तर्फे रविवार(25जुलै)ला स्वामींनारायन धाम सभागृहात गुरुपौर्णिमा निमित्य आयोजित रक्तदान शिबिर व सत्संग कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी भागवताचार्य मनीष महाराज,जेष्ठ विधिज्ञ रवींद्र भागवत,डॉ.शंकरराव अनंदनकर,चंद्रपुर गडचिरोली ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष सुरेश धानोरकर,पुनमचंद तिवारी,दत्तप्रसंन्न महादानी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

हंसराज अहीर म्हणाले,माधवैय्या मडगुलवार उपाख्य माधवैय्या महाराज यांनी आपल्याकडे असलेली विद्या ब्रह्मवृंदाला दिली.70 वर्ष त्यांनी धार्मिक व आध्यात्मिक कार्यातून चंद्रपूरकरांची सेवा केली.त्यांचा जीवन प्रवास बघितला तर,ते महाराज नाही संत होते.त्यांच्या शिष्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत गुरूला वाहिलेली आदरांजली प्रेरणा देणारी आहे.

 जेष्ठ विधिज्ञ रवींद्र भागवत म्हणाले,वेदभ्यासिमाधवैय्या महाराज यांनी मंत्र जागर काय असतो हे आम्हाला शिकवले.ब्रह्मवृंदाला त्यांनी शिक्षित केले.आपल्या जवळ असलेले ज्ञान त्यांनी इतरांना दिले.त्याची फलश्रुती म्हणून रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली दिली जात आहे.यातून माधवैय्या महाराज यांचे संस्कार दिसून येतात असे ते म्हणाले.

प्रारंभी पं. चंद्रशेखर माडगूलवार,पं रामप्रसाद मसादे,पं दत्तात्रय बनसोड,पं अमित देशपांडे यांनी मंत्रोच्चार करीत गुरू व व्यासपीठ पूजन केले,आणि रक्तदान व सत्संगाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या ब्राह्मण समाजातील रवींद्र दीक्षित,सचिन देधपांडे,उदय देऊळवार,मनोहर गहाणे  प्रभूतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भागवताचार्य मनीष महाराज यांनी भजनाद्वारे गुरू महिमा विशद केली. मंगेश भोम्बे, शैलेश किस्कोळ प्रणय किस्कोळ,, राहुल बनसोड,संदीप अनंदनकर,वैभव देसाई,अमित देशपांडे,देविदास देशकर,विनोद सूचक,मारोती शर्मा,विकास जुमडे,अंकीत तिवारी व सुनील उंबरकर यांनी रक्तदान केले.सर्व रक्तदात्यांना अहीर यांचेवतीने व हस्ते च्यवनप्राश व शासकीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ अंकुश खिचडे, पंकज पवार,प्रसाद शेटे,ईश्वरी जुमडे,अर्पणा रामटेके,आनंद चव्हाण,चेतन वैरागडे,अनिल वाकोडर व तज्ञ चमूने रक्त संकलन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.तर पं अमित देशपांडे यांनी आभार मानले.पासायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी ब्राह्मवृंद परिवारातील योगेश सप्रे,राम बुजोने,अजय वैद्य,अजय सप्रे,प्रदीप भट्टलवार,सौरभ जोशी,संजय थोडगे,प्रकाश वेदांतम,मारोती अलेना, रामप्रसाद मसादे,संजय बन्सोड आदींनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments