वर्डी गावात जाऊन पोलिस अधिकारी किरण दांडगे यांनी पोलिस विभागातर्फे .. आदिवासी महिलेसह मदतगार तरुणांचा केला सत्कार.

 

वर्डी गावात जाऊन पोलिस अधिकारी किरण दांडगे यांनी  पोलिस विभागातर्फे .. आदिवासी महिलेसह मदतगार तरुणांचा केला सत्कार..

 🔹विमान अपघातातील मदतगार पोलिसांच्या नजरेत झाले हिरो...

🔹तरूणांनी ठोकला खाकिला   "सॅल्यूट"


जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) :  तालुक्यातील वर्डी शिवारातील जंगल परिसरात दि.16 जुलै रोजी शिरपूर येथील प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त झाले.या भीषण विमान दुर्घटनेमध्ये मुख्य पायलट हा जागेवरच गतप्राण झाला तर सहाय्यक महिला पायलट तरुणी गंभीर जखमी होऊन विमानात अडकली होती.तिला त्या विमानातुन बाहेर काढून पुढील उपचाराकरीता रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे कामी बांबुची झोळी बनविण्यात आली.हि झोळी बनविण्यासाठी आपल्या अंगावरची साडी देणाऱ्या विमलबाई भिल व त्या झोळीच्या सहाय्याने जखमी तरुणीला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणारे तरुण यांचा अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी वर्डी या गांवी जाऊन सत्कार केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.16 जुलै रोजी वर्डी गावाजवळील जंगलात शिरपूर येथील प्रशिक्षणार्थी दोन सीटर विमान काही तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटनाग्रस्त झाले.यामध्ये मुख्य पायलट नुरुल अमीन रा.बँगलोर हा जागीच ठार झाला तर सहाय्यक पायलट तरुणी अंशिका गुजर हि गंभीर जखमी झाली.ती दुर्घटनाग्रस्त विमानात अडकून पडली असता तिला आदिवासी बांधव व वर्डी गांवातील तरुणांनी बाहेर काढले.व पुढील वैद्यकीय उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय येथे नेणेकामी रुग्णवाहिका आली होती.मात्र रुग्णवाहिका अपघात ठिकाणापासुन रस्ता नसल्यामुळे चार किलोमीटर लांब थांबलेली होती.तिथपर्यंत जखमी तरुणीला नेण्याकरीता शक्कल लढवीत बांबूच्या झोळीमध्ये तरुणीला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.व पुढे तिला उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरीता नानावटी हॉस्पिटल,मुंबई येथे हलविण्यात आले.आता त्या तरुणीची प्रकृती बरी असल्याचे समजते.

एकंदरीत या सर्व बचावकार्यामध्ये महत्वाची भुमिका बजावणारे आदिवासी बांधव,वर्डी गावातील तरुण मंडळी व बांबु झोळी करीता आपल्या अंगावरची साडी देणाऱ्या विमलबाई भिल्ल हे खरे हिरो आहेत.आणि यांचा यथोचित सन्मान व्हावा याच भावनेतुन अडावद पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांनी वर्डी या गांवी जावून ग्रामपंचायत कार्यालय येथे विमलबाई भिल्ल यांना नविन साडी भेट देवून सत्कार केला.तसेच रमेश बारेला,सुमेया बारेला,राजाराम बारेला,बिषण बारेल,साईराम बारेला,एकनाथ बारेला,राजील्या बारेल्या,रामलाल पावरा,नंदलाल भिल्ल,अविनाश धनगर,अमित शिंदे,हर्षल धनगर,मंगेश धनगर,विक्की पाटील,दिपक पाटील,उमाकांत धनगर,किरण बडगुजर,मुकेश पवार,राज पाटील,सुरज पाटील,किशोर पाटील,लखन गुजर,धनंजय पाटील,समाधान पाटील,अधिकराव धनगर व मुबारक तडवी आदिंचा टोपी,शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी हेड काँस्टेबल कादीर शेख,पोलीस काँस्टेबल अरेकर,डाॕ.कांतिलाल पाटील व पोलीस पाटील पदमाकर नाथ उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments