महाविकास आघाडी सरकारची द्वेषमूलक भावना व नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द - हंसराज अहीर
१२ आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यासाठी मा. राज्यपाल महोदयांना निवेदन
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : महाविकास आघाडी सरकारची द्वेषमूलक भावना व नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत या आरक्षणास पूर्ववत करण्याची मागणी भाजपा आमदारांकडून लोकशाही मार्गाने करण्यात येत असताना १२ आमदारांवर तालिका अध्यक्षांनी सूडबुद्धीने निलंबन कार्यवाही केली ही लोकशाहीची हत्या व व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी असून त्या १२ आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी, मूल यांच्यामार्फत मा. राज्यपाल महोदयांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा मा. श्री. हंसराज अहीर यांचे नेतृत्वात भाजप पदाधिकारी श्री. नंदू रणदिवे, चंदू मारगोनवर, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, नागराज गेडाम, प्रशांत लाडवे, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे , वंदना वाकडे , विद्या बोबाटे, प्रशांत लाकडे , दिलीप पाल, मुकेश गेडाम, प्रमोद कोपुलवार आदींनी निवेदन सादर केले.
0 Comments