बल्लारपूरच्या सौंदर्यात भर घालणारे मोर ठरले शोभेची वस्तू : लाखोंचा खर्च व्यर्थ ठरतो की काय ?

 

बल्लारपूरच्या सौंदर्यात भर घालणारे मोर ठरले शोभेची वस्तू : लाखोंचा खर्च व्यर्थ ठरतो की काय ?

प्रशासनासह कंत्राटदारांचे साफ दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न निर्माण

बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते या शहरात विविध धर्म,जाती व पंथाचे नागरिक गुण्यागोविंदाने वास्तव्य करतांना दिसतात विशेष बाब म्हणजे भाजप-सेना युतीच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचा विभाग म्हणून ओळखले जाणारे वित्त, वन व नियोजन असे महत्वपूर्ण खाते सांभाळणारे आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी विविध माध्यमातून विकासाची गंगा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात आणली मात्र त्यांनी या विधानसभा क्षेत्रावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जातो की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

 आज नगर परिषदेच्या माध्यमातून बल्लारपूर शहराच्या सौदर्यात भर पडावी म्हणून पेपरमिल काटागेट ते जुने बसस्थानक, व नगर परिषद परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तर वस्ती विभागातील महात्मा गांधी स्मारकापर्यंत महामार्गाच्या सौदर्यात भर पडावी म्हणून रस्ता दुभाजकातील विजेच्या पोलवर मोर पंख बसविण्यात आले होते विशेष बाब म्हणजे मागील वर्षी माजी प्रधानमंत्री यांच्या जन्मदिनी थाटात उदघाटन करण्यात आले मात्र रस्त्यावरील मोरपंख औट घटकेचे ठरले वर्तमान स्थितीचा विचार केला तर आज ही मोर पंख बंद अवस्थेत आहे अनेक मोर पंख वादळामुळे अस्तव्यस्त झाले असून याकडे प्रशासनासह कंत्राटदारांचे साफ दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे सामान्य जनतेच्या पैशातून या शहराच्या सौदर्यावर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जातो की काय असा प्रश्न सामान्य नागरिक करू लागले आहे मध्यतरी च्या काळात मोर पंख सुरळीत करण्यात आले होते मात्र आलेल्या वादळा मुळे रस्ता दुभाजकावरील मोरपंख अस्तव्यस्त झाले आहे सद्यस्थितीत कोरोनाच्या संक्रमणाच्या खाली यंत्रणा काम करीत असून सामान्य जनतेच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या सौदर्यात भर घालणाऱ्या मोर पंखाच्या दुरुस्तीकडे प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सामान्य नागरिक करू लागले आहे.

Post a Comment

0 Comments