दहावीचा निकाल जाहीर झाला : मात्र वेबसाईटच झाली क्रेश विद्यार्थ्यांची पळापळ

 

दहावीचा निकाल जाहीर झाला : मात्र वेबसाईटच झाली क्रेश विद्यार्थ्यांची पळापळ

 विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोनाच्या संक्रमण काळात मागील वर्षांपासून शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्याची पार कसरत होत आहे शाळेत एकही दिवस न जाता परीक्षा ही न देता सरसकट पास करण्याचं धोरण शासनाद्वारे अमलात आणले जात आहे अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असलेला अखेर दहावीचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाला विशेष बाब म्हणजे दुपारी 1:00 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते मात्र एकाच वेळेस लाखो विद्यार्थी निकाल बघत असल्याने जवळपास मागील 3 तासापासून बोर्डाची अधिकृत वेबसाईटच क्रेश झाली आहे.

 त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांची उत्सुकता असायची मात्र यावर्षी शालेय मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला तसेच विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार बोर्डाने जाहीर केलेल्या निकालानुसार राज्यातील 99.95 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे राज्यात कोकण विभागाचा निकाल 100% तर सर्वात कमी म्हणजे नागपूर विभागाचा 99.56% लागला आहे मात्र विद्यार्थ्याच्या दृष्टीने निकाल जाहीर करणाऱ्या http://result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या दोन्ही वेबसाईट निकाल जाहीर झाल्यापासून क्रेश झाल्याची माहिती मिळत आहे दरवर्षी निकालाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून अनेक वेबसाईट देण्यात येत होत्या मात्र यावर्षी केवळ 2 वेबसाईट च्या माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही विद्यार्थ्यांनी चिंता करू नये प्रयत्न करीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments