एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा गुदमरून मृत्यू : चंद्रपूर लगतच्या दुर्गापुरातील घटना

 

एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा गुदमरून मृत्यू  : चंद्रपूर लगतच्या दुर्गापुरातील घटना

दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला 

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : 12 जुलैला शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, मात्र दुर्गापुरात डीपी उडाल्याने काही परिसरातील वीज पुरवठा ठप्प झाला. दुर्गापुरात राहणारे लष्कर कुटुंबाच्या घरी मुलगा अजय याचा विवाह समारोह पार पडला होता, त्यांनी आपल्या सुनबाई माधुरी ला 2 दिवस आधीच घरी आणले.मात्र अचानक परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने रमेश लष्कर यांनी जनरेटर लावला, 45 वर्षीय रमेश लष्कर हे कंत्राटदार होते. पण तो जनरेटर त्यांच्या परिवाराचा घात करेल अशी कल्पनाही कुणाला नव्हती.मुलाच्या लग्नाचा आनंद त्या परिवारात होता, मात्र तो आनंद 12 जुलैच्या रात्री दुःखात बदलला.

रात्री 11.30 च्या सुमारास अचानक जनरेटर चा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटाने जनरेटर मधील विषारी वायूची गळती झाल्याने 6 जणांचा गुदमरून मृत्यू झाला मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. लष्कर कुटुंब नेहमी सकाळी 6 वाजता उठायचे मात्र मंगळवारी कुटुंबातील कुणीही बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी दार ठोठावले असता कुणीही दरवाजा उघडला नाही.

त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला असता घरात सर्व धुर पसरला होता, शेजाऱ्यांनी सर्वाना बाहेर काढले व रुग्णालयात नेले मात्र कुटुंबातील 6 जणांचा आधीच मृत्यू झाला होता.दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. सोमवारी लष्कर कुटुंबांनी नवविवाहित माधुरी लष्कर ला घरी आणले होते.सध्या 40 वर्षीय दासू लष्कर यांचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.




Post a Comment

0 Comments