मानाच्या पालखीसोबत किमान 500 लोकांना पायी वारीची परवानगी द्यावी, विश्व हिंदू परिषद चोपडा प्रखंडची मागणी...!
जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्राची भुमी ही साधु संतांची महान परंपरा लाभलेली पुण्य भुमी आहे.वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.शेकडो वर्षांचा इतिहास असलेली पायी वारी मोघलाच्या व इंग्रजाच्या काळात ही अबाधित होती.परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे वारी खंडीत झाली.परंतु ह्या वर्षी हाॅटेल, माॅल,दारूची दुकाने ,बाजारपेठा,लग्न समारंभ, सरकारी जाहिर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत.मात्र पायी वारीवर निर्बंध का? सर्व वारंकरी बंधू कोरोना संक्रमणासंबंधी सर्व नियम पाळूनसुद्धा शिस्त प्रिय वारंकरी वर शासनाचे बंधने का लादली जात आहेत. पायी वारीला 750 वर्षाची परंपरा आहे तसेच या वर्षी तुकाराम महाराजांचा ३६० वा पालखी सोहळा आहे.
म्हणून संत निवृत्ती,संत ज्ञानदेव,संत सोपान,संत मुक्तांई, संत एकनाथ, संत नामदेव व संत तुकाराम या मानाच्या १० पालख्या दरवर्षी वारीमध्ये सामील असतात त्यामुळे प्रत्येक पालखीसोबत किमान ५०० लोकांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी यासह वारकर्यांच्या इतर मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद चोपडा प्रखंड तर्फे तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी प्रखंड अध्यक्ष विलास बारी, प्रखंड मंत्री पवन चित्रकथी, सामाजिक समरसता मंत्री प्रेम घोगरे, बजरंग दल तालुका संयोजक आप्पाराज पाटील,शहर संयोजक रोहित पाटील, ललित चांदेलकर, अमोल विसावे, गणेश मराठे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments