मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आदीलाबाद जाणारी जड वाहतूक 2 दिवस बंद : पर्यायी मार्गाचा वापर करावा - अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर

 

मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आदीलाबाद जाणारी जड वाहतूक 2 दिवस बंद : पर्यायी मार्गाचा वापर करावा - अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : देशभरात पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे अनेक ठिकाणी मोठे वित्तहानी झाली आहे तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक तर विस्कळीत झालीच शिवाय दुर्दैवाने काही निष्पाप नागरिकांचा जीव ही गेला आहे महाराष्ट्रात या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

         या पावसाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर तेलंगाना व आंध्रप्रदेश राज्यातही मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात पोलीस अधिक्षक आदीलाबाद यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग ४४ हा पोलीस स्टेशन नरेंदिगोंडा जिल्हा आदीलाबाद येथे अति मुसळधार पावसामुळे रोड खराब(तुटलेला) आहे ज्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 24 तास ते 48 तास लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गाने आदीलाबाद जाणारे सर्व नागरिक व जड वाहनांनी पुढील सुचने पर्यंत या मार्गाचा वापर करू नये तसेच कोणतीही जीवित व वित्त हानी  होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक आदीलाबाद व अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments