निराधार योजनेतील 210 पैकी 176 अर्ज मंजूर

 

निराधार योजनेतील 210 पैकी 176 अर्ज मंजूर 

बल्लारपूर(राज्य रिपोर्टर)  : कुटुंबातील मुलाने आई वडिलांना वाऱ्यावर सोडल्यानंतर वृद्धांना एकतर वृद्धाश्रमात रहावे लागते किंवा शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना सह अनेक शासनाच्या अनुदान योजनेच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांना अनुदान मिळत असते. बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व अन्य योजनेतील लाभार्थीच्या निवडी साठी बल्लारपूर येथील तहसील कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली यावेळी विविध योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जापैकी 176 अर्ज मंजूर करण्यात आले तर 34 अर्ज नामंजूर करण्यात आले विशेष बाब म्हणजे तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपींक सुनील दडमल व दीपिका कोल्हे यांनी एकूण 210 निराधारांचे अर्ज सभेत ठेवले होते त्यापैकी 176 अर्ज मंजूर करण्यात आले यातही संजय गांधी निराधार योजनेचे 95 अर्ज तर श्रावण बाळ योजनेतील 81 अर्ज मंजूर करण्यात आले तर 34 अर्ज नामंजूर करण्यात आले, यासोबतच बल्लारपूर तालुक्यात कोरोनाच्या संक्रमण काळात पालकत्व गमावलेल्या पालकांचे 23 अर्ज प्रशासनाकडे आलेत त्यापैकी 15 अर्ज मंजूर करून ते पुढील कारवाई साठी पाठविण्यात आले.

         या निराधार योजनेतील अर्ज मंजुरीच्या बैठकीला मा.संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर, मा.रमेश कूळसंगे नायब तहसीलदार, महादेव देवतळे, अध्यक्ष निराधार योजना, प्रभाकर मुरकुटे, युसूफ शेख, अफसाना सययद, सुनिल बावणे, सुमित डोहणे, गोदाबाई कुलमेथे, इ ची प्रामुख्याने उपस्थिती होती.





Post a Comment

0 Comments