अखेर प्रतीक्षा संपली महाराष्ट्रातील दहावीचा निकाल उद्या दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार !

 

अखेर प्रतीक्षा संपली महाराष्ट्रातील दहावीचा निकाल उद्या दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार दि.१६ जुलै रोजी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ४ हजार ४४१ विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण १५ लाख ९२ हजार ४१८ हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात १० जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. आता एक दिवस उशीरा निकाल जाहीर होणार आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या शुक्रवारी १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे.

इथे पाहा निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.

त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.




Post a Comment

0 Comments