महापरिनिर्वान दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन - ना.उध्दव ठाकरे



 महापरिनिर्वान दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन - ना.उध्दव ठाकरे                     

 मुंबई(राज्य रिपोर्टर) : महापरिनिर्वाण दिन हा करोडो दलित शोषित, पीडित वंचित असलेल्या लोकांचा मुक्तीदाता असलेल्या महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने देशभरातून लाखो अनुयायी महामानवाच्या अभिवादनासाठी येत असतात.

 मात्र यावर्षी जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये परिस्थितीचे भान ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

 मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंम्बर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक पार पडली महापरिनिर्वाण दिन समनव्य समितीनेही अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे शिवाय मुख्यमंत्र्यानी विविध प्रकारच्या सूचनाही दिल्या आहेत त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना आणि अभिवादनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे तसेच विविध प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रक्षेपण करण्यात येणार आहे शिवाय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे मात्र कोरोना संकट काळात अनुयायांनी आप-आपल्या घरूनच महामानवाला अभिवादन करावे असे नम्र आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments