सात बहिणी टेकडीचे संवर्धन करून पर्यटनचा विकास करा

नमस्ते चांदा क्लबच्या माध्यमातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पेर्जागडच्या विकास करण्याची मागणी

सात बहिणी टेकडीचे संवर्धन करून पर्यटनचा विकास करा

 पश्चिम महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकाना विदर्भातील या जागेच्या पर्याय


चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) :  सामान्यत: आपण पश्चिम महाराष्ट्रातील टेकड्यांवर  ट्रेक करत असतो. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात, तळोधी गावाजवळ एक सुंदर स्थान आहे, जे पेर्जागड किंवा सात बहिणी टेकडी म्हणून ओळखले जाते.
 या टेकडीचा ट्रेक करण्याची हौस पूर्ण होणार आहे. त्याकरिता नमस्ते चांदा क्लबच्या माध्यमातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांना पेर्जागडच्या विकास करण्याची मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत लहानशा गावात वसलेली ही टेकडी जंगलाने व्यापलेली आहे. या टेकडीच्या माथ्यावरुन अत्यंत सुंदर दृश्य दिसते. जवळजवळ एक तासाचा हा ट्रेक आहे जो आनंदाने भरलेला आहे.
जर लोक तिथे नियमितपणे भेट देत असतील तर स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. शासन याकडे लक्ष देईल आणि ते या डोंगराळ जागेचीही काळजी घेतील. या सात बहिणी टेकडीचा ट्रेक करणे हा एक चांगला प्रयोग असेल. आपण पर्यटन किंवा ट्रेकिंगच्या उद्देशाने हे स्थान निवडून सुट्टी घालविली पाहिजे. बहुतेक लोक पश्चिम महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी जात असतात. पण विदर्भातील या जागेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
नागभीड तालुक्याच्या शेवटी 459 मीटर उंच डोंगर आहे. लांबून पाहिल्यास, किल्ल्यासारखे दिसते कारण त्याच्या माथ्यावर मोठे खडक आहेत.  नाव सतबहिनी म्हणजे सात बहिणी ज्या अम्बाई, निंबाई, मुक्ताई, लक्ष्मी, सरस्वती, महाकाली आणि दुर्गा आहेत.  नोंदणीकृत नाव “पेरजागड” आहे. प्राचीन काळापासून त्यांची निवासी गुहा आणि मंदिरे अजूनही आहेत.1964 पासून दरवर्षी जवळपासचे लोक मकरसंक्रांती आणि महाशिवरात्रीसारख्या उत्सवांसाठी एकत्र जमतात.  टेकडीच्या शिखरावरुन दिवसाच्या विशिष्ट वेळी सूर्यास्त व सूर्योदय पहाता येतात.
नमस्ते चांदा क्लब तर्फे तर्फे पर्जागढ बद्दल जनजागृती अभियान राबविण्यात आले, युवकांनी या गडावर जाऊन त्या गडाची साफ सफाई करून गड किल्ले संवर्धनाचा प्रन घेतला. या माध्यमातून नमस्तेचांदा मधील युवकांनी पेर्जागड याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी पर्यटन मंत्री मनानिय आदित्य ठाकरे यांना केली आहे.  यावेळी  हितेश कोटकर, सागर मसादे,  वैभव थोटे,  अनिकेत सायरे,  कमलेश चटप,  सागर महाडोले,  प्रितम खडसे,  महेशचंद्र सोमनाथे,  प्रणय दुर्वे,  प्रवीण पाटील,  यतिश मेश्राम,जगदीश रचावार, सिद्धांत नगरकर,  रोशन कोंकटवार,  चेतन इंगोले,  झंकार साखरकर, अमित हिरादेवे, जितेश नान्हे, आदित्य पडीशालवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments