राळेगाव भाजपाने केली वीजबील होळी



 राळेगाव भाजपाने केली वीजबील होळी

वीजबील माफ करा....राळेगाव तालुका भाजपा ची मागणी

  यवतमाळ/ राळेगाव (राज्य रिपोर्टर) :        कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात व महाराष्ट्रात तीन महिन्याचे लाॅकडाऊन घोषीत करण्यात आले होते.तद्नंतर जनजीवन सामान्य होण्यासाठी दीर्घकाळ लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे रोजगार गेले,उपासमारी ची वेळ आली, लघू  व मध्यम व्यवसायीक रसातळाला लागले,काम बंद असल्यामुळे कष्टकरी व मजूर वर्गाचे बेहाल झाले.पोटभरण्याच्या चिंतेत असलेला सर्वसामान्य नागरीक महाराष्ट्र शासनाच्या बेताल धोरणांमुळे जनक वेठीस धरल्या जात आहे. 

            सर्वांचे डोळे माय बाप सरकार कडे  लागले असतांना महाआघाडी सरकारने व उर्जा मंत्री मा.नितीन राऊत यांनी  केलेल्या घोषणांवर कोलांटीउडी मारत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सक्ती ची भाषा करण्यात येत आहे. 

            कोरोना महामारी च्या काळातील पाठविलेल्या अवाजवी वाढीव वीजबील दिल्यामुळे  आधीच महाआघाडी सरकार च्या बेताल धोरणांमुळे त्रस्त झालेला सर्व सामान्य बांधव चिंतेत सापडला आहे. दिलासा देणे दुरचं राहिले आणि वीज तोडायचे आदेश देण्यात आले आहे. शेती पंपाच्या विजेमुळे शेतकरी व वाढीव वीजबील दिल्यामुळे   सर्वसामान्य नागरीक अन्यायकारक परीस्थितीत होरपळून निघत आहे. 

           अवाजवी वाढीव वीजबील संपूर्ण माफ करण्यात येऊन नियमीत विज पुरवठा करावा तसेच शेती पंपाची वीज अखंडपणे सुरळीत करावी आणि वीजेबाबत निर्माण झालेल्या समस्या तात्काळ निकाली काढाव्या अशा मागण्या घेऊन भारतीय जनता पार्टी राळेगाव तालुक्याच्या वतीने वीजबील होळी आंदोलन महावितरण कार्यालया समोर करण्यात आले.मा.उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन देवून शासन दरबारी आमचे म्हणणे मांडावे अशी विनंती करण्यात आली.  

                यावेळी चित्तरंजन दादा कोल्हे,मोहनसेठ गुंदेचा,  प्रशांत तायडे, भालचंद्र कविश्वर,डाॅ.कुणाल भोयर,सौ.उषाताई भोयर,शिलाताई सलाम,विवेक दौलतकर,सौ.विद्याताई लाड,  गजानन लढी,बाळासाहेब दिघडे,बबनभाऊ भोंगारे,  प्रज्वलीत जगताप,आशिष इंगोले, दिनेश गोहने,संदीप तेलंगे,सौ.छायाताई पिंपरे,डाॅ.सविता ताई पोटदुखे,डाॅ अशोक थोडगे,  अरूणभाऊ शिवणकर,किशोर जुनूनकर,वनीताताई दुर्गे,सौ.सिमाताई येडस्कर, सौ.संतोषीताई वर्मा,सौ.शितल राऊत,करूणाताई वानखेडे,गोविंद डोंगरे, प्रफूल कोल्हे,चंद्रशेखर कामडी,अनील पिंपरे,विठ्ठल नेहारे,नरेंद्र बावने शुभम मुके,विवेक गवळी,  विनायक महाजन,पारस वर्मा,जिवन दाभेकर, सागर वर्मा, आकाश कुळसंगे,राज राणे,प्रदीप भोयर, रोशन नेहारे,नितीन शिडाम,लखन कनोजीया, निकेत भलमे,देवराव नाखले,शैलेश कांबळे,दिपक कोडापे,प्रभाकर एकोणकार,प्रभाकर घोटे,प्रभाकर शिंदे, संतोष झुंझूरकर,नागोराव पोटफोडे,सुधाकर शिखरे,अभिजीत धोबे व कार्यकर्ता बंधू भगीनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments