26/11 शहीद दिनानिमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन



 26/11 शहीद दिनानिमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन                

 बल्लारपूर(राज्य रिपोर्टर) : 26 नोव्हेम्बर मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी समुद्र मार्गाने येऊन पाकिस्थान या शेजारील देशातील दहशतवादी संघटनेने मुंबईत येऊन अनेक ठिकाणी दहशत निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ओबेराय हाऊस, ताज हॉटेल, अशा अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार करून अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला या घटनेत हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे सारख्या अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा जीव गेला मात्र शूरवीर पोलीस शिपाई यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला पकडले व कालांतराने त्याला भारत सरकारने फाशीची शिक्षा दिली.

 मात्र मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने या घटनेच्या स्मृती निमित्ताने देशभरात शहिदांना देशभरात आदरांजली अर्पण करण्यात येते या अनुषणगाने बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या निमित्ताने शहिदाना अभिवादन म्हणून 26/11 शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना या विषाणूजन्य आजारावर मात करण्यासाठी पोलीस स्टेशन बल्लारपूर च्या निमित्ताने 28 नोव्हेम्बर 2020 ला सकाळी 8:00 ते 4:00 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन आहे यात 18 वर्ष व त्यावरील नागरिक सहभागी होवू शकतात तसेच प्लाझ्मा दान करतांना वजन 50 किलो व त्यापेक्षा अधिक असले पाहिजे तसेच कोरोना आर.बी.डी-ऍन्टीबॉडी ची पातळी 640 व त्यापेक्षा अधिक असल्यास प्लाझ्मा दान करावे तसेच गरजवंताना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन मा. उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर, सपोनि विकास गायकवाड, सपोनि धर्मेंद्र जोशी, सपोनि रासकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments