पीडितांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावल्या आमदार


पीडितांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावल्या आमदार 

शॉट सर्किटमुळे घर, गुरांच्या गोठ्याला आग : आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा मदतीचा हात 

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): भद्रावती तालुक्यातील घोनाड येथील तीन घराना व गोठ्याला शॉट सर्किटमुळे आग लागली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरातील जीवनावश्यक वस्तू पासून ते इतर साहित्यांचा कोळसा झाला. हे वृत्त आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना कळताच, त्यांनी शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मदतीचा हात समोर केला. त्यांनी स्वतःकडून धान्य किट व रोख रक्कम दिली. त्याच प्रमाणे घटनेच्या पंचनामा करून पीडित व्यक्तीना मदत करण्याचे निर्देश दिले. 
भद्रावती तालुक्यातील  घोनाड येथील शंकर बोंडे यांच्या घराला शॉट सर्किटमुळे आग लागली. तसेच प्रवीण आवारी यांचे बैल व गोठा जळाला व राजू उरकुडे, सुर्यभान नरोले यांचा गोठा जळाला. या घटनेमुळे या कुटुंबांवर दुःखाच्या डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यतत्पर आमदार प्रतिभाताई धानोरकर या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचा सोबत नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी काळे, तलाठी कुलमेथे, भुसारी, प्रवीण शेरकी, पोलिस पाटील घोनाड, .विनोद ठोंबरे, ग्रा. स. घोनाड, .पंढरीपाटील बोंडे, .बबन पाटील खरवडे उपस्थित होते. त्यांना या घटनेचा पंचनामा करून पीडित व्यक्तीना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मदतीने गावकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले.

Post a Comment

0 Comments