जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु
आठ जण नव्याने पॉझेटिव्ह तर तीन जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. 6 (राज्य रिपोर्टर) : यवतमाळ जिल्हा सोमवारी आणखी एका कोरोनाबधित रुग्णाचा झाल्याने जिल्ह्यात मृत्युंचा आकडा 12 वर पोहचला आहे. आज (दि.6) दिवसभरात आठ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सोमवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय मृतकाचा समावेश आहे. तर इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील पुरुष आणि उर्वरीत सहा जण दिग्रस येथील आहे. यात तीन महिला व तीन पुरुष आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता. यात आज आठ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 75 वर गेली. यात एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 74 झाली होती. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या तीन जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 96 जण भरती आहे.
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 87 रिपोर्ट प्राप्त झाले. यात आठ पॉझेटिव्ह आणि 79 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 329 वर पोहचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 12 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 92 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 5982 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5427 प्राप्त तर 555 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5098 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
0 Comments