स्वच्छ बल्लारपुरातअस्वछतेचे चित्र : डासामुळे रोग पसरण्याची भीती


स्वच्छ बल्लारपुरातअस्वछतेचे चित्र : डासामुळे रोग पसरण्याची भीती      
                             
 बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बल्लारपुर शहराने लक्षणीय प्रगति केली आहे तसेच विविध प्रकारच्या उपाययोजना करून शहराला एक विशिष्ट दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असले तरी कोरोना या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अनेक कर्मचारी या आजारामुळे प्रभावित(संशयित) असणाऱ्या नागरिकांच्या सेवेत असले तरी उपलब्ध असलेल्या कर्मचारी च्या आधारावर स्वच्छता होने अपेक्षित आहे.

 मात्र शहराच्या काही ठिकानचे चित्र चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे याविषयीच्या सविस्तर माहितीनुसार नगर परिषद चौक परिसरातून वस्ती विभागाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगत अग्निशमन विभागाच्या कार्यालया पासून ते गोल पुला पर्यंत च्या रेल्वे लाईन परिसर लगतची सफाई करण्यात आली आहे.

 व त्यातील असलेला कचरा मुख्य मार्गावर टाकन्यात आला असून तो त्या जागेवरुन त्वरित उचलने अपेक्षित असतांना तो तसेच पड़ून असल्यामुळे पाऊसामुळे डासाँची निर्मिति होवून रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर परिसरातील कचरा त्वरित उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यामुळे स्वच्छ व सुंदर बल्लारपुरात अस्वछतेचे चित्र तर निर्माण होत नाही ना असा ही प्रश्न निर्माण होवू शकतो.

Post a Comment

0 Comments