महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भंडारा जिल्हा शाखेतर्फे कोरोना योद्धा सन्मानीत


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भंडारा  जिल्हा शाखेतर्फे कोरोना योद्धा सन्मानीत

भंडारा(राज्य रिपोर्टर ):-- दिनांक 6/7/2020 ला सकाळी 11 वाजता सामान्य रुग्णालय भंडारा येथे, भंडारा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग काळात

 उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष सदाशिव ढेंगे यांच्या अध्यक्षतेखाली, व मा जिल्हाशल्यचिकित्सक प्रमोद खंडाते यांचे उपस्थितीत व नरेश बोपचे विदर्भ संघटक पत्रकार संघ, प्रवीण तांडेकर, सचिव पत्रकार संघ, विलास सुदामे उपाध्यक्ष, प्रवीण वानखेडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ, अभिजित घोडमारे यांचे उपस्थितीत कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

 यामध्ये,डाॅ. बडे मॅडम, डाॅ. अली मॅडम सामान्य रुग्णालय भंडारा, सुरेखा मोहुर्ले सामाजिक सेविका, महानंदा बसेशंकर,मनीषा लोणारे, संजय मते, हरिदास कुरंजेकर, मंगला ठोंबरे, वैशाली तांडेकर, स्वेता नागमोते, सुनंदा बसेशंकर, सुनीता ठाकरे यांचा कोविड योध्दा म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुस्त, देऊन सत्कार करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण तांडेकर, व संचालन नरेश बोपचे यांही केले तर आभार विलास सुदामे यांही केले.भविष्यातही राज्य पत्रकार संघ शाखा भंडारा महत् काय॔ करणाऱ्यांचे सत्कार करणार असल्याचे जिल्हा अ्ध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments