भंडारा शहरात पुन्हा एकदा भरदिवसा युवकाची हत्या



भंडारा शहरात पुन्हा एकदा भरदिवसा युवकाची हत्या

हत्या, शुक्ररीवारी वार्ड परिसरात घटनेने खळबळ

भंडारा २९ जून,(राज्य रिपोर्टर) : भंंडारा शहरात  हत्या झाल्याने शहरातील वातावरण हे भयभित झालेले आहेत.  शहरात गुन्हेगारी व आसूडी वृत्तीचे लोकांनी डोकेवर काढले असल्याचे दिसुन येत आहे. अशा परिस्थितीत पोलीस विभागाला सक्रिय होऊन अशा गुन्हेगारी वृत्तीचे लोकांचे मुसके आवरण्याची गरज असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे.

आज दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान भर दिवसा सुरज यादव नामक युवकाचा काही लोकांनी हत्या करुन पसार झाल्याने शुक्रवारी मध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. सदर युवकाला रोडाच्या कडेवरच पकडून त्याची हत्या केला असुन त्याच्या गळा व पोटावर मोठया प्रमाणात चाकुचे वार करुन जागीच ठार केला .सदर घटनेची माहीती मिडताच लगेच भंडारा पोलीसांनी येऊन घटनेवरील साहीत्य तसेच मृतदेहाला पोस्टमार्टम करीता सामान्य रुग्णालयात पाठविले.

 सुत्राच्या माहीतीनुसार सदर युवका हा शुक्रवारी येथे किरायाने राहत असुन वरठी येथील एका मोठया कंपनी मध्ये ठेकेदारी पध्दतीने कार्यरत असल्याची माहीती पुढे येत आहे.परंतु हत्या का झाली कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहे. घटना स्थळी स्वःता डि.वाय.एस.पी. रिना जनबंधु उपस्थीत होते तर घटनेची माहीती मिळताच थानेदार लोकेश कणसे हे घटनेचा तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments