वनजमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवर वनविभागाचा अनाधिकृत 'बळगा'
■ २००६ वनहक्क कायद्याची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली : राजु झोडे
■ जमीनी कसणाऱ्या आदिवासींवर डिएफओची बेकायदेशीर मुजोरी
■ बेकायदेशीर गैरवर्तन करणाऱ्या डिएफओ वर कारवाई करा
■ उलगुलान कास्तकार संघटना आक्रमक
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असून जिल्हाभर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास म्हटलं की शेकडो वर्षापासून या जिल्ह्यात राहत असणारा आदिवासी बांधव आपली व आपल्या कुंटुबांची उपजीविका वनजमीनी कसून वर्षानुवर्षे चालवित आहेत. ह्याच जमिनिचे पट्टे मिळावे म्हणून जिल्ह्यातील हजोरो आदिवासी बांधव शेकडो वर्षापूर्वी जिल्हाधिकारी यांचेकडे दावे सादर केले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व वनविभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी वनजमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना शेती करण्यात कोणतीही अडचण व कोणत्याही प्रकारे आडकाठी आणू नये असे सांगितले असतांना सुद्धा वनविभागाकडून नाहक हरकत केल्या जात आहे. आत्तापर्यंत कोणत्याही जिल्हाधिकारी यांनी वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवाची दखल घेतली नाही वा त्यांना जमिनीचे पट्टे दिले नाही. ही लाजरवाणी बाब शेकडो वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी बांधवाच्या चंद्रपूर जिल्ह्यात पहायला मिळते आहे. ही बाब कायम असतांना मात्र वनविभागाच्या ताडोबा अंधारी वनक्षेत्रातील डिएफओ महाशय आता मुल,सिंदेवाही, चिमुर या भागात राहुन वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वनजमीनीत जाऊन बळजबरीने शेतकऱ्यांना मारहाण करुन नाहक शिवीगाळ करुन शेतातून गैरकायदेशीर हुसकावून लावण्याचा मुजोरपणा चालवला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवाकडून रोष व्यक्त केला जात असून या विरोधात उलगुलान कास्तकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर डिएफओ गुरुप्रसाद यांचेवर कारवाईची मागणी केली आहे.
चंद्रपूर, चिमुर, मुल येथील वनजमीनी कसणाऱ्या आदिवासी बांधवाचा वनकायदा २००६ अंतर्गत कायदेशीर हक्क असतांना वनविभागाच्या अशा मुजोर अधिकाऱ्याकडून अनाधिकृतपणे आदिवासी बांधवांना शेती कसण्यापासून हुलकावणे, नाहक शिविगाळ करणे, शेतात बेकायदेशीर बुलडोझर चालवने , व शेतकऱ्या मारहाण करने ही गैरककृत्य डिएफओ गुरुप्रसाद यांचेकडून वारंवार केल्या जात असल्याने पडित शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन त्यांच्या वतीने उलगुलान कास्तकार संघटनेचे सस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन आदिवासी बांधवांना असा नाहक त्रास देणाऱ्या डिएफओ गुरुप्रसाद यांचेवर ताबडतोब कारवाई करुन शेतकऱ्यांना शेती कसण्यास मुभा द्यावी व प्रलंबित असलेले वनहक्क दावे त्वरित निकाली काढावे अशी मागणी केली आहे.
वरील रास्त मागणी मान्य न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा उलगुलान कास्तकार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे अँड फरहत बेग ,गुलाब कारमेंगे,शंकर चौधरी,कृष्णा गेजिक, कुडाजी कोटनाके,लक्षण मडावी,रामप्रशांत भाई,कुशाल सोयाम,विठ्ठल कोहपरे, दादाजी शेरकी बंडु रामटेके यांनी दिला असून आंदोलना दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही शासन प्रशासनाची राहील असा इशारा केला आहे.
0 Comments