टायगर ग्रुप बल्लारपुर तर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना विज बिल माप करण्याबद्दल निवेदन
बल्लारपूर, (राज्य रिपोर्टर) : टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर भाऊ जाधव अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप चंद्रपूर चे युवा नेतृत्व माननीय पैलवान सूर्या भाऊ अडवले यांच्या नेतृत्वाखाली आज टायगर ग्रुप बल्लारपुर तर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब बल्लारपूर यांना विज बिल माप करण्याबद्दल निवेदन देण्यात आले.
कारण की कोरणा-या आजार मुळे महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यापासून लोक डाऊन होतं लोकांना रोजगार नव्हता पण महाराष्ट्र सरकारने लोकांना भरमसाठ बिल पाठवले त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब माननीय उद्धव साहेब ठाकरे तथा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्राद्वारे विज बिल माफी ची मागणी करण्यात आली याप्रसंगी टायगर ग्रुप बल्लारपूर चे प्रमुख सदस्य आदित्य शिंगाडे, नीरज यादव, गौरव नाडमवार, कुणाल बहुरीया, अमान कैथवास, पवन नालमवार, केतन भेंडे, अभय मेश्राम, सुजल सेंडे, शुभम पाटील, आशिष फूल झाले, मलिक खान, आशय वाघमारे आधी कार्यकर्ता उपस्थित होते.
0 Comments