30 जून रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रा.आ. केंद्रें व ग्रामीण रूग्णालयात एकाचवेळी होणार ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण
बल्लारपूर येथील ग्रामीण रूग्णालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, याठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण दिनांक 30 जून 2020 रोजी सकाळी 11.00 वा. एकाच वेळी करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, याठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन च्या माध्यमातुन आरोग्य कवच प्रदान करण्याचा संकल्प आ. सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केला होता. या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रूग्णालयांमध्ये उपचारार्थ येणा-या नागरिकांसाठी सॅनिटायझरच्या माध्यमातुन आरोग्य कवच उपलब्ध करण्यात येणार आहे. या सोबतच सॅनिटायझर, मास्क, आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळयांचे वितरण सुध्दा करण्यात येणार आहे.
दिनांक 30 जून रोजी सकाळी 11.00 वा. बल्लारपूर येथील ग्रामीण रूग्णालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात येणार असून त्याचवेळी अन्य ठिकाणीही लोकार्पण करण्याण्त येणार आहे. यात कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते, पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्णालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते, मुल येथील उपजिल्हा रूग्णालयात माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते, मारोडा आणि राजोली येथील प्रा.आ. केंद्रात जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते, चिरोली येथील प्रा.आ. केंद्रात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे यांच्या हस्ते, बेंबाळ येथील प्रा.आ. केंद्रात मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांच्या हस्ते, नवेगांव मोरे येथील प्रा.आ. केंद्रात पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते, चिचपल्ली येथील प्रा.आ. केंद्रात जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते, दुर्गापूर येथील प्रा.आ. केंद्रात भाजपा नेते रामपाल सिंह यांच्या हस्ते, विसापूर येथील प्रा.आ. केंद्रात चंद्रपूरचे उपमहापौर राहूल पावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
या लोकार्पण सोहळयाला अर्थात आरोग्य कवच प्रदान सोहळयाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बल्लारपूर भाजपाचे अध्यक्ष काशि सिंह, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, जि.प. सदस्य राहूल संतोषवार, मुलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, अजय गोगुलवार, आनंदराव ठिकरे, जि.प. सदस्या वैशाली बुध्दलवार, पृथ्वी अवताडे, शितल बांबोडे, गौतम निमगडे, हरीश गेडाम, विनोद देशमुख, हनुमान काकडे या उदघाटन प्रमुखांसह या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, दत्तप्रसन्न महादाणी, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू यांनी केले आहे.
0 Comments