आम आदमी पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात सक्रियपने मदत करणाऱ्या 290 नागरिकांना सन्मानपत्र देवून सत्कार


आम आदमी पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात सक्रियपने मदत करणाऱ्या 290 नागरिकांना सन्मानपत्र देवून सत्कार       

 बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) : जवळपास 3 महिन्यापासुन देशभरात कोरोना या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असून या रोगामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे मात्र या कोरोनाच्या काळात आम आदमी पार्टी बल्लारपुरच्या वतीने सामान्य नागरिकांना सक्रियपने मदत करण्यात आली.

 आम आदमी पार्टीचे चंद्रपुर जिल्हा संगठन मंत्री परमजीत सिंग झगड़े यांच्या नेतृत्वात बल्लारपुर शहरातील 17 वार्ड येथील जवळपास 900 नागरिकांना सतत 45 दिवस मोफत भोजन बनवून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविन्यात आले तसेच 78 सामग्री किट सुध्दा वाटन्यात आली कोरोना संक्रमण काळात या पुण्याच्या कार्यात मदत करणाऱ्या बल्लारपुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विविध सामाजिक सघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव, पोलिस बांधव, अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 290 नागरिकांना आम आदमी पार्टीच्या वतीने आभार पत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

 सद्यस्थितित 200 नागरिकांना सन्मानपत्र देण्यात आली असून उर्वरित नागरिकांना लवकरच सम्बंधित नागरिकांच्या घरी जावुन सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी परमजीत सिंग, चंद्रपुर जिल्हा संगठन मंत्री, एडवोकेट किशोर पुसलवार जिल्हा विधी सल्लागार, बलराम केशकर, शहर संयोजक, रवी पपुलवार सह संयोजक, आशिफ शेख सचिव, नंदकिशोर सिन्हा संगठन मंत्री, मनीष नागापुरे कोषाध्यक्ष, अभय यादव मीडिया प्रभारी, अवधेश तिवारी, अजय क़सारे, कमलेश देविकर, जितेंद्र यादव, दिनेश जयस्वाल, इर्शाद, रमजान भाई, भगत सिंग आजाद, राजू, विवेक, बाडू भाऊ, समशेर सिंग चौहान, ई नी महत्वपूर्ण सहयोग दिला आहे.

Post a Comment

0 Comments