जिवतीत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात मुस्लिम समाजाचा धरणे व निषेध मोर्चा

तहसिलदाराऱ्यांमार्फत सरकारला निवेदन



 जिवती:-
  दि.२५ डिसेंबर १९
          केंद्र शासनाने पारीत केलेल्या दुरूस्ती विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी भारतीय मुस्लिम परीषद, बहुजन समाज व अन्य संघटनानी महेबुब भाई याच्यां अध्यक्षतेखाली   जिवतीत बुधवारला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारो मुस्लिम समाजाचे हजारो नागरिक  महीला व मुले सहभागी झाले होते. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन आदोंलनकर्त्याच्चा शिष्टमंडळाने तहसिलदार मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठविले.

केंद्र शासनाने अलिकडेच नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेत पारित केला. या विधेयकाला इतर राज्यात विरोध होत असतानाच जिवती तालुक्यातील मुस्लिम बांधव व अन्य संघटनांनी देखील विरोध दर्शविला आहे, दरम्यान भारतीय मुस्लिम एकता परिषद वतीने जिवतीत या विधेयकाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते.
या पार्श्वभूमीवर जिवती तालुक्यातील अनेक भागातून मुस्लिम बांधव व अन्य समाजातील बांधव शहिद बाबुराव शेडमाके चौक येथे जमा झाले. दुपारी १२.३० वाजता शेडमाके चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते.केंद्र सरकार व विधेयकाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे.जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती,जमाती,मुस्लिम समाजाने विरोध दर्शविला आहे.  दरम्यान आजच्या मोर्चादरम्यान  अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी चोख  पोलीस बंदोबस्त कायम होता. शहरातील बाबूराव शेडमाके मुंडा चौक मार्गावरून सदर मोर्चा बिरसा मुंडा येथे  धरणा देत मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.त्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणार्‍यांना सभेत मार्गदर्शन केले.शेवटी एका शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला  आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चात महेबुब अली शेख , अजगरअली शेख जमालुद्दीन शेख, अध्यक्ष भारतीय मुस्लिम परिषद ,निशिकांत सोनकाबंळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,शब्बीर जागिरदार ,प्रा. लक्ष्मण मंगाम,अंकुश गोतावळे, रशिद शेख ,अशपाक शेख नगर उपाध्यक्ष  ,किसन लव्हराळे, रशिद अली नगरसेवक ,सत्तार शेख ,गफ्फार शेख लाला शेख ,आरीफ शेख, कलीम शेख ,मुन्ना शेख ,रसुल शेख, सलीम सैय्यद ,सलीम शेख ,जबार शेख ,जबार कुरेशी आदींसह हजारों नागरिक उपस्थित होते.मोर्चा व धरणे यशस्वीतेसाठी जमालूदीन शेख,अजगरअली शेख,शब्बीर जागीरदार,सत्तार शेख यानी अथक परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments