चिमूर पंचायत समिती मध्ये दलालांचा सुळसुराट जोमात !

चिमूर पंचायत समिती मध्ये दलालांचा सुळसुराट जोमात !


चंद्रपुर,चिमुर : जिल्हयातील येणाऱ्या चिमूर तालुक्यात दररोज सभोवतालच्या खेड्यापाड्यातील लोक हे आपले प्रशासकीय कामे करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. पण, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या 'पंचायत समिती' या कार्यालयामध्ये  अनेक दिवसांपासून दलालांचा सुळसूळाट फार मोठ्या प्रमाणात वाढला असून ते सामान्य माणसाकडून, शेतकरी, शेतमजूरांकडून लूट करीत असल्याची खमंग चर्चा परिसरात होत असल्याची दिसताहेत.
   
ग्रामीण भागात राहत असलेले निरक्षर लोक हे आपल्या प्रशासनाच्या कामाला आठवड्यातून दोन तीनदा तरी पंचायत समिती मध्ये येत असतात. निरक्षर असल्यामुळे त्यांना काहीच समजत नाही. नेमका याचाच फायदा येथील दलाल जास्त प्रमाणात घेत आहेत. निरक्षर लोक शासनाच्या निरनिराळया योजनांचे लाभ मिळण्यासाठी फार्म भरुन दयावा लागतो. परंतू  अज्ञान निरक्षर असल्यामूळे ह्या सर्व प्रक्रिया करणे जमत नसल्यामुळे लोक दलालांच्या बळी पडत आहेत. देण्यासाठी येत असतात, तेव्हा हे दलाल लोक मी तुमचे काम त्वरीत करून देतो असे म्हणून गोरगरिबांची पिळवणूक होत आहे. त्यांच्याकडून पैशाची मागणी करत असतात. व त्या निरक्षर लोकांनी पैसे दिले नाही, तर त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या देऊन "तुम्ही आमच्या हाताने काम केले नाही तर..तुमचे काम होणारच नाही " असे संबोधतात व त्यांना कामात अडथळा निर्माण करतात. या पद्धतीने दलाल लोक निरक्षर लोकांना आपल्या जाळ्यात फसवतात. हे मागील अनेक दिवसांपासून चालू आहे तर याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष केंद्रित करतील का..??

Post a Comment

0 Comments